Shri Mauli Krupa Orphanage was established with a simple objective - “To give a new identity to the children of orphans, destitute, and prostituted women and give them an opportunity to grow up under the umbrella of society.”
With a clear vision and strong determination, the members of our trust worked tirelessly for the upliftment of socially marginalized children. Every step was taken to develop their physical, mental, and emotional well-being. Despite facing many difficulties and even starvation, they persevered, appealed for help, and successfully laid the foundation of the orphanage to serve more orphans, poor, and needy children.
The children of Shri Mauli Kripa Orphanage never felt abandoned as they received loving parental support and affection from our Trust members. The members of the Trust took responsibility for their education, ensuring a brighter future for them.
While starting Shri Mauli Kripa Orphanage, key individuals such as Smt. Prachi Amol Deshmukh, Shri Amol Kakasaheb Deshmukh, Smt. Anuradha Amit Deshmukh, and Shri Amit Kakasaheb Deshmukh provided strong support for the construction of the orphanage. They became pillars of support during difficult times, overcoming numerous challenges to move the orphanage forward.
Shri Mauli Kripa Orphanage has received immense support from consultants, donors, funding agencies, and the government. The organization is approved by the Department of Women and Child Development, and children are admitted by the order of the Bal Kalyan Samiti, Pune.
We realized there was a need to create an organization to prevent such children from being identified solely as children of prostitutes, orphans, or destitute children. With this purpose, Shri Mauli Kripa Orphanage was founded in 1998 at Alandi, a pilgrimage site known for the shrine of Shri Sant Dnyaneshwar Maharaj.
श्री माऊली कृपा अनाथालयाची स्थापना एका साध्या उद्देशाने झाली - “अनाथ, निराधार आणि देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना एक नवीन ओळख देणे आणि त्यांना समाजाच्या छत्राखाली वाढण्याची संधी देणे.” आम्हाला जाणवले की अशा मुलांना देह विक्री करणाऱ्या महिलांची मुले, अनाथ किंवा निराधार मुलं म्हणून ओळखले जाऊ नये म्हणून एक संस्था सुरू करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने 1998 साली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थान असलेल्या आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदी येथे श्री माऊली कृपा अनाथालयाची स्थापना करण्यात आली.
स्पष्ट दृष्टिकोन आणि दृढ निश्चयाने, आमच्या ट्रस्टच्या संपूर्ण सदस्यांनी सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित मुलांच्या उन्नतीसाठी काम केले. प्रत्येक पाऊल अनाथ, निराधार आणि गरजू मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या विकासासाठी उचलले गेले. पण त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; अनेक वेळा उपाशी राहावे लागले, परंतु अनाथ मुलांसाठी मदतीचे आवाहन केले. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती, दृढ निश्चय आणि मेहनतीने सर्व अडथळ्यांवर मात करून श्री माऊली कृपा अनाथालयाचा भक्कम पाया घालण्यात आणि अधिक अनाथ, गरीब व गरजू मुलांची सेवा करण्यात यशस्वी झाले.
श्री माऊली कृपा अनाथालयातील मुलांना कधीही असे वाटले नाही की ते अनाथ आहेत, कारण त्यांना आमच्या ट्रस्टच्या सदस्यांकडून पालकत्वाचा प्रेमळ आधार आणि स्नेह मिळाला. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ट्रस्टच्या सदस्यांनी उचलली. श्री माऊली कृपा अनाथालयाच्या विश्वस्त मंडळाच्या कष्टाळू कामामुळे हे शक्य झाले आहे. श्री माऊली कृपा अनाथालय नेहमीच समाजाची सेवा करण्याच्या आणि गरीब व निराधार मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या प्रयत्नात असते.
श्री माऊली कृपा अनाथालय सुरू करताना श्रीमती प्राची अमोल देशमुख, श्री अमोल काकासाहेब देशमुख, श्रीमती अनुराधा अमित देशमुख आणि श्री अमित काकासाहेब देशमुख यांनी या अनाथालयाच्या उभारणीसाठी खंबीर पाठिंबा दिला. कठीण काळात ते श्री माऊली कृपा अनाथालयासाठी आधारस्तंभ बनले आणि सर्व अडचणींवर मात करत अनाथालयाला पुढे नेले. श्री माऊली कृपा अनाथालयाला सल्लागार, देणगीदार, निधी संस्थांकडून तसेच शासनाकडूनही मजबूत पाठिंबा मिळाला आहे. महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून संस्थेला मान्यता मिळाली आहे. तसेच बाल कल्याण समिती पुणे, यांच्या आदेशाने बालके दाखल होतात.